Goat Farming Scheme Maharashtra Goverment 2021

शेळी पालन अनुदान योजना राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना 2021-22

नमस्कार मित्रांनो,

महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभागा मार्फत महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार, शेळी पालक, मेंढी पालक त्याच प्रमाणे ज्यांना शेळी पालन करायचे आहे पण आर्थिक अडचणी मुळे जे करू शकत नव्हते त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागा मार्फत शेळी पालन कर्ज अनुदान योजना राबवण्यात येत आहे.


"जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना / आदिवासी उपाययोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 10+1 शेळी गट पुरवठा करणे"


शेळी पालन अनुदान योजना 2021-22


शेळी पालन व्यवसाय लाभदायक आहे का ?

शेळीपालन व्यवसाय हा असा एकमात्र व्यवसाय आहे की जो अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून सुरू करू शकतात.
त्यामुळे या व्यवसायात गुंतवणूक कमी आणि उत्पादन जास्त आहे. शेळीपालन ह्या व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओडखले जाते परंतु काही वर्षांपासून ह्या व्यवसायाला शेतकरी आणि नवयुवक मुख्य व्यवसाय म्हणून करत आहेत. कारण बोकडाच्या मटनाला वाढत दर.

शेळी पालन अनुदान योजना राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना

शेळी पालन अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक वातावरणात तग धरतील म्हणजेच आपल्या भागात मिळणाऱ्या स्थानिय शेळ्यांच्या गट मिळेल.
या योजनेत लाभार्थ्यांना 10 शेळ्या व 01 बोकड किंवा 10 मेंढ्या व 01 नर मेंढा वाटप करण्यात येईल.
शेळी पालन अनुदान योजना म्हणजेच "जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना / आदिवासी उपाययोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 10+1 शेळी गट पुरवठा करणे" अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 10 शेळ्या व 01 नर मेंढा यांची किंमत ठरविण्या बाबत G.R काढला आहे.


G.R (शासन निर्णय) वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


10+1 शेळी मेंढी गट वाटपासंदर्भात अनुदान

मित्रांनो "जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपाययोजना / आदिवासी उपाययोजना / आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजने अंतर्गत 10+1 शेळी गट पुरवठा करणे" या योजनेसाठी खुल्या व इ.मा.व. प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने ५० टक्के अनुदान मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ७५ टक्के अनुदान या योजनेसाठी मिळणार आहे.


शेळी मेंढी गट वाटप अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा


शेळी मेंढी गट वाटप लाभार्थी निवडीचे प्राधान्यक्रम

शेळी मेंढी गट वाटप योजनेसाठी खालील प्रमाणे लाभार्थी निवडीचा प्राधान्यक्रम राबविण्यात येणार आहे.

1) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी

2) १ हेक्टर जमीन असलेले अत्यल्प भूधारक शेतकरी.

3) रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले सुशिक्षित बेरोजगार तरुण


शेळी मेंढी गट वाटप योजनेसाठी अर्जासोबत कागदपत्रे

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१ फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२ दारिद्रयरेषेखाली असल्याचा दाखला
३ ७/१२ व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ८
४ प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत
५ जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
६ बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र
७ रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे नांव नोंदणी कार्डची सत्यप्रत.
८ अपत्य दाखला (ग्राम पंचायत यांचा)

Goat Farming Scheme Maharashtra Goverment 2021 Goat Farming Scheme Maharashtra Goverment 2021 Reviewed by Nitesh S Khandare on June 01, 2021 Rating: 5

6 comments:

  1. Online application ahe ka ashel tar website pathava

    ReplyDelete
  2. Government goat farming training certificate kuthe bhetate

    ReplyDelete
  3. आबाराव भास्कर खरात मु कंटाळा खु ता मंठा जिल्हा जालना

    ReplyDelete
  4. रोहिदास बाबासाहेब साळुंके शेंरोडी बु.गाव ता, फुलंब्री जि, औरंगाबाद

    ReplyDelete
  5. LuckyClub Casino Site | Lucky Club Casino, Free Spins, Bonus
    Lucky Club Casino has all the fun and excitement of a top-notch online casino. With the new and luckyclub exciting way to play, you're always near the

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.

Powered by Blogger.